बंद शाळेवर तिसरा डोळा ; शिक्षक सेना आक्रमक

Foto
संचार बंदीच्या काळात शाळा बंद असताना शिक्षणाधिकारी चक्क तिसरा डोळा उघडून उपस्थितीची नोंद घेत असल्याने शिक्षक सेना आक्रमक झाली आहे. शिक्षणाधिकाऱ्यांच्या कोणत्याही नोटिशीला शिक्षकांनी उत्तर देऊ नये असे आवाहन शिक्षक सेनेचे राज्याध्यक्ष ज.मो. अभ्यंकर यांनी केले आहेत  
नांदेड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत जुलै महिन्यात जि.प.चे शिक्षणाधिकारी हे बंद असलेल्या शाळेत जाऊन शाळेत शिक्षक का उपस्थित नाहीत म्हणून अनुपस्थितीबाबत खुलासा मागत आहेत,  याबाबत महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या जिल्हा शाखेकडून प्रसिद्धी पत्रक जारी करण्यात आले आहे.
सध्या नांंदेड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांबाबतीत शिक्षणाधिकारी (प्रा) यांनी आदेश देऊन सर्वच शिक्षकांनी शाळेत  उपस्थित रहावे असा व्हाटसप आदेश देऊन संभ्रम निर्माण केलेला आहे. आणि जे शिक्षक शाळेवर उपस्थित राहिले नसल्यास त्यांना अनुपस्थितीबाबत नोटीस देऊन खुलासा मागविण्यात येत आहे. याचा शिक्षकांना नाहक त्रास होत आहे.  याबाबत शिक्षक सेनेच्या वतीने तशी माहिती मा.अभ्यंकर साहेब , राज्याध्यक्ष तथा अध्यक्ष ,  अल्पसंख्यांक आयोग (राज्यमंत्री दर्जा ) यांंच्या कडे कळविण्यात आली होती. त्यावर साहेबांनी  'कोणताही खुलासा देऊ नका. कोरोनाकाळात शासकीय पातळीवर घरीच राहा आणि सुरक्षित राहा असा सल्ला देण्यात येत आहे. कोरोना संसर्गाच्या तीव्र फैलावामुळे कामाच्या ठिकाणी उपस्थित न राहिल्याने कुणीही कार्यवाही करु शकत नाही.' असे सांगितले आहे. त्यामुळे शाळा बंद असल्याच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही शिक्षक बांधव वा भगिनींनी कसल्याही संभ्रमात राहु नये. शिक्षक सेना सदैव आपल्यासोबत असून शिक्षकांच्या शाळेतील उपस्थितीबाबत  शासनाचे २४जून २०२० नुसार मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आली असतांनाही जिल्ह्यातील कोणत्याही ठिकाणी कोणत्याही प्रकारचा मानसिक त्रास झाल्यास अथवा कोणत्याही परिस्थितीत वेतनवाढ रोखणे, पगार बंद करणे याबाबत धमकी वा लेखी नोटीस दिल्यास संबंधित अधिकारी, पदाधिकारी यांना शिवसेना स्टाईलने उत्तर देण्यात येईल, असे जिल्हाध्यक्ष संतोष अंबुलगेकर यांनी शिक्षक सेनेच्या वतीने जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker